Pradhan Mantri PM Mudra Loan Yojana Details in Marathi
Pm Mudra Yojana Loan हि भारत देशाच्या केंद्र सरकारची योजना आहे.हि योजना भारताचे प्रधानF मंत्री श्री नरेंद्र जी मोदी यांनी सुरु केलेली आहे.
मुद्रा कर्ज किंवा प्रधान मंत्री मुद्रा योजना लोन हि योजना देशातील सूक्ष्म व लघु उद्योग व्यवसाय याना २०,००,००० \- ( वीस लाख रुपये ) पर्यंत कर्ज प्रदान करत असते.या सर्व कर्जांना तारण मुक्त कर्ज असेही म्हटले जाते.हि सर्व कर्जे देशातील बिगर / विना कृषी क्षेत्रात उत्पन्न मिळवून देणाऱ्या क्रिया साठी तयार केलेली आहेत.या मध्ये जसे कि व्यापार , उत्पादन आणि सेवा या व्यतिरिक्त मधमाशी , कुक्कुटपालन यान सारख्या शेती निगडीत व्यवसाय या सर्वांचा समावेश आहे. मुद्रा कर्ज अशी ओळख असलेल्या या योजनेचे कर्ज हे देशातील व्यावसायिक बँक, प्रादेशिक बँक लघु बँक , या सारख्या वित्तीय संस्था यांचे द्वारे विस्तारित / प्रदान केले जाते.
योजनेचे नाव | Pm Mudra Yojana Loan |
सुरु करणार | केंद्र सरकार |
उद्दिष्ट | लघु आणि सूक्ष्म व्यवसायांना आर्थिक सहाय्य करणे |
कर्ज प्रकार | १. शिशु २. किशोर ३. तरुण |
अधिकृत वेबसाईट | https://www.mudra.org.in/ |
वाचा
PradhanMantri Vidya Laxmi Yojana
MukhyaMantri Vayoshri Yojana
प्रधान मंत्री मुद्रा लोन योजना उदिष्ट
प्रधान मंत्री मुद्रा लोन योजना सुरु करण्याचे उदिष्ट पुढील प्रमाणे
- देशातील लघु आणि सूक्ष्म व्यवसाय / उद्योग यांना आर्थिक पाठबळ पुरवणे.
- देशात नाव नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
- तरुण वर्गाला नवीन व्यवसाय / उद्योग सरू करण्या करिता किंवा सुरु असल्वेला व्यवसाय मोठा विस्तार करण्या साठी प्रधान मंत्री मुद्रा लोन योजना द्वारे कर्ज मिळवून देणे.
- तारण मुक्त कर्ज प्रदान करण्यात येते.
- सुरक्षा ठेव असणायची काही गरज नाही.
- कर्ज वाटप योजनेच्या तीन प्रकारत केले जाते.
Pm Mudra Yojana Loan कर्ज प्रकार
प्रधान मंत्री मुद्रा लोन योजनेचे स्वरूप महत्वाचे असल्या कारणाने या योजनेचे वर्गीकरण तीन प्रकारात करण्यात आले आहे. हे प्रधान मंत्री मुद्रा लोन योजनेचे तीन प्रकार पुढील प्रमाणे
१. शिशु कर्ज प्रकार
२. किशोर कर्ज प्रकार
३. तरुण कर्ज प्रकार
१. शिशु कर्ज प्रकार
शिशु कर्ज प्रकार हा या प्रधान मंत्री मुद्रा लोन योजनेचा प्रथम प्रकार आहे.या शिशु कर्ज हे लहान व्यवसाय असणार्या सर्व उद्योजकान साठी उपलब्ध आहे. या मध्ये व्यावसायिकांना त्यांच्या उद्योग साठी कच्चा माल किवा आवश्यक उपकरणे खरेदी करण्या साठी या शिशु कर्ज प्रकल्पांतर्गत ५०,००० \- ( पन्नास हजार ) रुपये मिळतात.
२. किशोर कर्ज प्रकार
किशोर कर्ज प्रकार हा या प्रधान मंत्री मुद्रा लोन योयानेचा दुय्यम प्रकार आहे.हे किशोर कर्ज प्रकल्प व्यवसायाचा विस्तार करण्या साठी आहे.यात व्यवसाय स्थापन केल्याची प्रक्रिया पूर्ण असावी लागते.या मध्ये किशोर कर्ज प्रकारात ५०,००० /- ते ५,००,००० ( पन्नास हजार ते पाच लाख ) रुपयान पर्यंत कर्ज उपलभ आहे.
३. तरुण कर्ज प्रकार
तरुण कर्ज प्रकार हा या प्रधान मंत्री योजनेचा अंतिम प्रकार आहे.या तरुण मुद्रा अक्र्ज प्रकार मध्ये अशा व्यवसायान करिता आहे ज्यांनी स्वतः ला पूर्ण भक्कम पाने उभे केले आहे आणि आता त्यांना व्यवसाय वाढी साठी निधीची कमतरता जाणवत आहे.या तरुण कर्ज प्रकट ५,००,०००/- ते १०,००,०००, ( पाच लाख ते दहा लाख रुपये ) एवढे भक्कम आर्थिक पाठबळ / सहाय्य मिळते.
Pm Mudra Yojana Loan पात्रता
या प्रधान मंत्री मुद्रा लोन योजने साठी पात्र होण्या करिता काही नियमावली ठरवून देण्यात आली आहे. हि नियमावली पुढील प्रमाणे
- कलाकार, किरकोळ विक्रेते, व्यापारी आणि उत्पादक
- लघु आणि सूक्ष्म युनिट्स उत्पादन
- व्यक्ती, मध्यम आणि लघु आकार असलेले व्यवसाय / उद्योग
- भागीदारी व्यवसाय , सेवा क्षेत्र एकल मालकी इत्यादी
Pm Mudra Yojana Loan आवश्यक कागद पत्रे
या Pm Mudra Yojana Loan साठी अर्ज सदर करण्या करिता काही विशेष कागद पत्रे ठरवून दिलेली आहेत.ती कागद पत्रे पुढील प्रमाणे
- Pm Mudra Yojana Loan अर्ज
- ओळखीचा पुरावा ( आधार कार्ड , मतदार ओळख पात्र, पास पोर्ट प्रत इत्यादी )
- पत्याचा दाखला ( वीज बिल, टेलिफोन बिल , आधार कार्ड इत्यादी )
- बँक खाते , बँक खाते व्यवहार दर्शविणारे प्रत
- उत्पन्न कर
Pm Mudra Yojana Loan देणाऱ्या संस्था
Pm Mudra Yojana Loan देण्या साठी भारत सरकारने काही संस्थांना परवानगी दिलेली आहे. या संस्था पुढील प्रमाणे
- सार्वजनिक क्षेत्र असलेल्या बँक
- खाजगी क्षेत्र असलेल्या बँक
- राज्य सहकारी बँक
- प्रादेशिक ग्रामीण बँक
- लघु वित्त बँक
- सूक्ष्म वित्त बँक
प्रधान मंत्री मुद्रा लोन अधिक माहिती
FAQS Pm Mudra Yojana Loan
प्रश्न १ : Pm Mudra Yojana Loan कोणी सुरु केली ?
उत्तर : Pm Mudra Yojana Loan योजना भारत देशाचे प्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केली.
प्रश्न २ : Pm Mudra Yojana Loan व्याज दर किती आहे ?
उत्तर : Pm Mudra Yojana Loan व्याज दर ८.६० % आहे.
प्रश्न ३ : Pm Mudra Yojana Loan ची परतफेड कालावधी किती आहे ?
उत्तर : Pm Mudra Yojana Loan योजनेचा कालावधी हा १ वर्षे ते ७ वर्षे इतका आहे.
प्रश्न ४ : Pm Mudra Yojana Loan किती प्रकारत मोडले जाते ?
उत्तर : Pm Mudra Yojana Loan कर्ज वाटप हे शिशु , किशोर आणि तरुण या तीन प्रकारात मोडले जाते.