PradhanMantri Vidya Laxmi Yojana Details In Marathi
PradhanMantri Vidya Laxmi Yojana हि योजना आपल्या भारत देशाच्या प्रधानमंत्री (PM) सन्माननीय श्री नरेंद्र जी मोदी यांनी हि PradhanMantri Vidya Laxmi Yojana सुरु केलेली आहे. या योजनेद्वारे प्रधानमंत्री ( PM ) जी देशातील उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांना शैक्षणिक कर्ज प्रदान करते.हि प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना अधिक प्रभाव शाली करण्या साठी केंद्र सरकार तब्बल ७.७५ लाख ( ७, ७५,००० ) रुपयांपर्यंत कर्ज वाटप करते.या बरोबरच या शैक्षणिक कर्जावर केंद्र सरकारने ७५ % एवढे क्रेडीट देण्याची ग्वाही दिली आहे. भारत केंद्र सरकारने ८६० विशेष उच्च शैक्षणिक संस्था मध्ये प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थी वर्गाला भारत शासन खास हे कर्ज प्रदान करत आहे.हे कर्ज सर्व प्रकारच्या तारण आणि हमी यांपासून मुक्त ठेवण्यात आले आहेत.
या प्रधानमंत्री योजने मध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी वर्गाला यामध्ये कुठल्याही प्रकारचे तारण ठेवण्याची आवश्यकता नाही . आणि तसेच कोणताही हमिदाराची सुधा गरज नसणार आहे.या सुव्यवस्थित पद्धती मुळे तरुणांना या प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना अर्ज करणे सोपे होत आहे.हि योजना देशातील प्रादेशिक सर्व ग्रामीण बँक , सहकारी बँक , आणि अनुसूचित बँक या सर्व बँकांना लागू करण्यात आलेली आहे.या योजने साठी २०२४ – २०२५ पासून २०३० – २०३१ पर्यंत तब्बल ३,६०० कोटी ( तीन हजार सहाशे कोटी ) रुपये इतका निधी आहे.
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना माहिती
PradhanMantri Vidya Laxmi Yojana Details
योजनेचे नाव | प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना ( PM ) |
सुरु करणार | केंद्र सरकार |
उदेश्य | देशातील विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणा साठी शैक्षणिक कर्ज देणे |
संस्था | QHEI श्रेणीतील उच्च संस्था |
कर्ज रक्कम | ७, ७५, ००० /- ( सात लाख पंच्याहत्तर हजार ) |
तारण / हमीदार | देशातील विध्यार्थी वर्गाला कर्ज परवडावे या करिता या प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजने मध्ये कुठल्याही प्रकारचे तारण किंवा हमीदार असण्याची आवश्यकता नाही असे नमूद करण्यात आले आहे. |
मंजूर बँक | देशातील सहकारी बँक , प्रादेशिक सर्व बँका आणि अनुसूचित बँक इत्यादी बँक यांना मंजुरी दिली आहे. |
क्रेडीट | ७५ % एवढे क्रेडीट देण्याची हमी आहे. |
योजनेचे अधिकृत वेबसाईट / पोर्टल | https://pmvidyalaxmi.co.in/ |
आमचे इतर योजना
MukhyaMantri Vayoshri Yojana
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना फायदे
- या योजनेंतर्गत देशातील तरुणांना कर्ज मिळते.
- ७ , ७५ , ००० ( सात लाख पंच्याहत्तर हजार ) एवढ्या रकमेचे
- ७.७५ एवढी कर्ज क्रेडीट
- कर्ज दर विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारचे तारण किंवा हमीदार ठेवण्याची गरज नाही.
- अत्यंत सोपे , पारदर्शक , आणि डिजिटल स्वरूप मुळे अर्ज प्रक्रिया सुलभ.
- कर्ज साठी अर्ज करण्या करिता बँकेत फेऱ्या मारण्याची चिंता नाही .
- कोणत्याही प्रकारचे छुपे / लपवलेले शुल्क नसणार.
- या प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर सर्व बँक एकाच ठिकाणी / जागेवर मिळणार .
प्रधानमंत्री लक्ष्मी योजने साठीचे पात्रता निकष
भारत सरकारने सुरु केलेल्या या योजने साठी काही पात्रता निकष ठरविलेले आहेत.हे निकष पुढील प्रमाणे
- कर्ज मंजूर होण्या पूर्वी सर्व बँक अर्जदार विध्यार्थी वर्गाचे प्रोफाईल तपासून / पडताळून पाहतात.
- विद्यार्थी / विद्यार्थिनी इयत्ता १० वी + १२ वी बोर्ड वर्ग उत्तीर्ण झलेला असावा.
- विध्यार्थी / विद्यार्थिनी भारत देशाचा सुजन नागरिक असावा.
- अर्ज दर विद्यार्थी / विद्यार्थिनी भारत देशात किंवा अन्य परदेशात उच्च शिक्षण घेण्य साठी या प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेला अर्ज सदर करू शकेल.
- विद्यार्थी / विद्यार्थिनी यांचे वय १८ वर्षे संपूर्ण असावे.
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेसाठी मंजूर बँक ( BANK )
या भारत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री योजने साठी कोणत्या बँक अधिकृत नोंदणी प्राप्त आहेत. त्यांची यादी पुढील प्रमाणे
बँक ऑफ बडोदा | छत्तीसगड राज्य ग्रामीण बँक |
बँक ऑफ इंडिया ( BOI ) | सिटी युनियन बँक लिमिटेड |
बँक ऑफ महाराष्ट्र | डोंबिवली नागरी सहकारी बँक लिमिटेड |
सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया | जीपी पारसिक बँक लिमिटेड |
फेडरल बँक | एचडीएफसी बँक ( HDFC ) |
आयसीआयसीआय बँक | आयडीबीआय बँक |
इंडियन बँक | आयडीएफसी फर्स्ट बँक |
इंडियन ओव्हरसीज बँक | पंजाब बँक |
कोटक महिंद्र बँक | कर्नाटक ग्रामीण बँक |
स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI ) | युनियन बँक ऑफ इंडिया |
युको बँक | येस बँक |
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजने साठी लागणारी कागद पत्रे
चला त मग पाहूयात सरकारने कोणते कागद पत्रे या विद्या लक्ष्मी योजने साठी लागू केलेलं आहेत.
- आधार कार्ड / ओळख पत्र
- विद्यार्थी / विद्यार्थिनी यांचे अधिकृत जन्म प्रमाण पत्र
- इयता १० वी + १२ वी या वर्गांचे शैक्षणिक प्रमाण पत्र ( उत्तीर्ण झालेले प्रमाण पत्र )
- स्वतः चे पास पोर्ट साईझ फोटो
- जर कोणी विद्यार्थी / विद्यार्थिनी परदेशातील शिक्षणा साठी अर्ज करत असेल तर विद्यार्थी / विद्यार्थिनी चे अधिकृत मंजूर असलेले पास पोर्ट ( विमान प्रवास ) शिक्षणा साठी मजूर झालेला व्हिसा मंजुरी आणि याबरोबरच ठरवून दिलेले इतर कागद पत्रे
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजने साठी अर्ज प्रक्रिया
भारत सरकारने या प्रधानमंत्री ( PM ) योजने साठी https://pmvidyalaxmi.co.in/ अधिकृत संकेतस्थळ नियुक्त केले आहे. या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता.
आपण हा लेख संपूर्ण पाने वाचलात या साठी आम्ही आपले आभारी आहोत !
धन्यवाद !