MukhyaMantri Vayoshri Yojana | मुख्यमंत्री वयोश्री योजना

MukhyaMantri Vayoshri Yojana Information in Marathi

MukhyaMantri Vayoshri Yojana हि महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली योजना आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील वय वर्षे ६० पेक्षा जास्त असलेल्या जेष्ठ नागरिकांना या योजने द्वारे वैधकीय उपकरणे विकत घेण्यासाठी आर्थिक सहायता दिली जाते.वैधकीय उपकरणे जसे कि श्रवण यंत्र , चष्मा , वाकिंग स्टिक , इत्यादी …

MukhyaMantri Vayoshri Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MukhyaMantri Vayoshri Yojana Information in Marathi

MukhyaMantri Vayoshri Yojana हि एक महाराष्ट्र सरकारच्या योजनांपैकी एक योजना आहे.या योजनेच मध्ये महाराष्ट्र सरकार राज्यातील वयोवृद्ध नागरिकांना वैधकीय उपकरणे खरेदी साठी मदत करत असते. वैधकीय उपकरणे जसे कि चष्मा , वाकिंग स्टिक ,श्रवण यंत्र , व्हील चेयर अशा प्रकारच्या वैधकीय उपकरणे घेण्या साठी आर्थिक मदत करते.

या MukhyaMantri Vayoshri Yojana मध्ये महाराष्ट्र सरकार वय वर्षे ६० पेक्षा जास्त असलेल्या सर्व जेष्ठ नागरिकांना या वैधकीय उपकरणांच्या वस्तू विकत घेण्य साठी ३ हजार ( ३,००० /- ) एवढी रक्कम देऊ करते. या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा मुख्य उदिष्ट हे राज्यातील जेष्ठ नागरिकाना त्यांच्या दैनंदिन आयुष्यत येणाऱ्या अडी अडचणींना तोंड देण्या साठी मदत करणे ,म्हणजे शारीरिक समस्या आणि या बरोबरच मानसिक आरोग्याच्या अडचणी या सारख्या बिकट परिस्थितीला हरवण्य साठी मदत करणे.

हे MukhyaMantri Vayoshri Yojana राज्यातील जेष्ठ नागरिकान साठी एक सरकारचे महत्वाचे धोरण आहे.जे या सर्व जेष्ठ नागरिकांना समृद्ध जीवन जगण्या साठी मदत करणार आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यत वय वर्षे ६५ किंवा यापेक्षा जास्त वय असलेल्या आपल्या आजूबाजूच्या सर्व जेष्ठ नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक जीवनात अनेक अडी अडचणींचा सामना करावा लागतो.या वाढत्या वयाने आणि त्याबरोबच सुरु झलेल्या अशक्त पणा , डोळ्यांची कुवत खालावणे , कानी ऐकू येन , बिकट समस्यांना त्यांना सामोरे जावे लगते.या साठी उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने हे मुख्यमंत्री वयोश्री योजना हे धोरण अवलंबिले आहे.

आमचे इतर योजना

Gharkul Yojana 2025

योजनेचे नाव MukhyaMantri Vayoshri Yojana
सुरु करणार महाराष्ट्र सरकार
उदिष्ट राज्यातील जेष्ठ नागरिकांना मदत करणे
लाभार्थी वय वर्षे ६५ पेक्षा जास्त
लाभ ३ हजार ( ३,००० /- ) रुपये इतकी आगाऊ रक्कम
साहित्ये श्रवण यंत्र , व्हील चेअर , चष्मा , वाकिंग स्टिक अशा प्रकारच्या अनेक वैधकीय वस्तू …
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन / ऑफलाईन
योजनेची अधिकृत वेबसाईटhttps://testdbtcmvayoshree.mahaitgov.in/

MukhyaMantri Vayoshri Yojana फायदे

या योजने मध्ये महाराष्ट्र सरकार राज्यातील जेष्ठ नागरिकांना ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशा सर्व नागरिकांना त्यांचे समस्यांचे समाधान व्हावे या करिता काही वैधकीय वस्तू विकत घेण्य साठी आर्थिक मदत करते.

या वस्तू पुढील प्रमाणे

  • लंबर बेल्ट
  • व्हील चेयर
  • कमोड खुर्ची
  • नि ब्रेस
  • वाकिंग स्टिक
  • चष्मा
  • श्रवण यंत्र
  • ३,००० /- ( तीन हजार रुपये ) एवढी रक्कम थेट बँकेत जमा होणार

MukhyaMantri Vayoshri Yojana पात्रता निकष

महाराष्ट्र सरकारच्या या MukhyaMantri Vayoshri Yojana साठी पात्र होण्या साठी काही निकष ठरवून देण्यात आलेले आहेत. हे सर्व निकष पुढील प्रमाणे आहेत

  • या मुख्यमंत्री वयोश्री योजना लाभ घेण्य साठी नागरिक / अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे बंधन कारक आहे.
  • नागरिकाचे किवा अर्जदाराचे तारीख ३१ डिसेंबर २०२३ अखेर पर्यंत वय वर्षे ६५ पूर्ण केलेले असावे.
  • नागरिकाचे / अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे २ लाख ( २,००,०००, /- ) च्या आत असणे बंधन कारक आहे.
  • अर्जदार नागरीका जवळ स्वताचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.याबरोबरच आधार कार्ड पावती देखील असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार नागरिक व्यक्तीकडे राशन / BPL कार्ड असणे पण बंधन कारक आहे.
  • या बरोबरच अर्जदार नागरिक व्यक्ती कडे स्वताचे कोणत्याही राष्ट्रीय बँकेचे पासबुक आसवे जेणेकरून अर्जदार नागरिकाला मदत म्हणून मिळणारी ३,००० ( तीन हजार ) रुपय एवढी रक्कम थेट बँक खात्या मध्ये जमा होईल.
  • अर्जदाराकडे/ / नागरिकाकडे आधार कार्ड नसल्यास त्या ऐवजी मतदान कार्ड देखील ओळखीचा पुरावा म्हणून असणे गरजेचे आहे.

MukhyaMantri Vayoshri Yojana साठी लागणारी आवश्यक कागद पत्रे

सदरील मुख्यमंत्री वयोश्री योजना साठी काही अति आवश्यक कागद पत्रे ठरवून देण्यात आलेली आहेत.

चला तर मग पाहूयात कोणती आहेत ती कागद पत्रे

  • अर्जदार व्यक्तीचे स्वतःचे आधार कार्ड
  • स्वतः लिहून दिलेले स्वयं घोषणा पत्र
  • बँकेचे पासबुक किंवा पासबुक ची झेरोक्स प्रत
  • अर्जदार व्यक्तीचे स्वतः चे २ पास पोर्ट साईझ फोटो
  • महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असलेला रहिवासी पुरावा / दाखला
  • उत्पन्न प्रमाण पत्र ( २ , ००, ००० /- ) दोन लाख रुपयांपेक्षा कमी असलेले वार्षिक उत्पन्न

MukhyaMantri Vayoshri Yojana साठी अर्ज कसा सदर करावा / भरावा

सदर महाराष्ट्र सरकारच्या या मुख्यमंत्री वयोश्री योजना मध्ये अर्ज सदर करण्यासाठी सरकारने दोन पद्धती निश्चित केल्या आहेत.

१. ऑनलाइन २. ऑफलाईन आपण या ठरवून दिलेल्या कुठल्याही एका पद्धतीने या MukhyaMantri Vayoshri Yojana मध्ये अर्ज दाखल करू शकतो.

१. ऑनलाइन अर्ज दाखल / सदर करण्यासाठी या MukhyaMantri Vayoshri Yojana अधिकृत वेबसाईट https://testdbtcmvayoshree.mahaitgov.in/ या वेबसाईट ला भेट देऊन आपला अर्ज भरू शकतो.

२. ऑफलाईन पद्तीने अर्ज दाखल / सदर करण्या साठी आपल्याला आपल्या जिल्हाचे ठिकाणी असणार्या सहायक आयुक्त समाज कल्याण मध्ये अर्ज सदर करता येईल.

आपण हा संपूर्ण लेख वाचलात यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत !

धन्यवाद !

FAQS MukhyaMantri Vayoshri Yojana

प्रश्न १ : मुख्यमंत्री वयोश्री योजना कोणी सुरु केली ?

उत्तर : मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केली .

प्रश्न २ : या मुख्यमंत्री योजनेत कोण पात्र आहेत ?

उत्तर : या मुख्यमंत्री वयोश्री योजनेत महाराष्ट्र राज्यातील वय वर्षे ६५ पूर्ण केलेले जेष्ठ नागरिक पात्र आहेत.

प्रश्न ३ : हि मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करते वेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते ?

उत्तर : महाराष्ट्र वयोश्री योजना सरू करते वेळी महाराष्ट्र राज्याचे मुखमंत्री Shri. EKNATH JI SHINDE हे मुख्यमंत्री होते.

प्रश्न ४ : या मुख्यमंत्री वयोश्री योजने मध्ये जेष्ठ किती रुपयांपर्यंत मदत मिळते ?

उत्तर : या मुख्यमंत्री वयोश्री योजने मध्ये जेष्ठ नागरिकांना ३ , ००० /- ( तीन हजार ) रुपये एवढे अर्थ सहायता मिळते.